श्रीगोंदा तालुक्याच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब; राम जाधव यांच्या ‘शालेय प्रतिभा दूत’ या नवोपक्रमास राज्यात दुसरा क्रमांक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, संशोधन विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राम जाधव यांच्या 'शालेय प्रतिभा दूत' या नवोपक्रमास राज्यात दुसरा क्रमांक

टीम लोकक्रांती
काष्टी, श्रीगोंदा | दि.२३ फेब्रुवारी २०२३ :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, संशोधन विभागाच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत, जनता कन्या विद्यालय काष्टी येथील उपक्रमशील शिक्षक राम जाधव यांच्या ‘शालेय प्रतिभा दूत’ या नवोपक्रमास माध्यमिक,उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक या गटात राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. पुणे या ठिकाणी आयोजित केलेल्या पारितोषिक समारंभात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यभरातून जवळपास ५८४ इतके नवोपक्रम राज्य पातळीवर दाखल झाले होते त्यातून वेगवेगळ्या पाच गटात प्रत्येकी दहा नवोपक्रम अंतिम फेरीत दाखल झाले होते दिनांक २० फेब्रुवारी रोजी या सर्व नवोपक्रमांचे परीक्षण करण्यात आले आणि त्यातून अंतिम प्रत्येक गटात पाच विजेते घोषित करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्याच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब असून तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर लौकिकाला नेण्याचे काम राम जाधव यांनी केले आहे. शालेय प्रतिभा दूत या नवोपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, नाविन्यता शोधण्याचे काम करण्यात आले, यात प्रामुख्याने कविता सृजन, मी विद्यार्थी मी अभियंता, रयत क्लास बँक, पुस्तक दानपेटी, चित्रकलेतून स्व प्रकटीकरण, पोस्टर सादरीकरण, वाढदिवसातून सामाजिक जाणिवेची निर्मिती, वृक्षारोपण आणि संवर्धन, स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, ७५ महापुरुष माहितीपट, माझा गाव, माझी माझी संस्कृती, वाचनातून मूल्यशिक्षण अशे विविध अभिनव उपक्रम राबविण्यात आले, त्याचीच राज्यस्तरावर दखल घेऊन राम जाधव यांच्या नवोपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.9 ° C
25.9 °
25.9 °
75 %
5.9kmh
100 %
Sat
27 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
26 °
Wed
28 °
error: Content is protected !!