परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा – सचिन झगडे

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

टीम लोकक्रांती
काष्टी, श्रीगोंदा | दि.२३ फेब्रुवारी २०२३ :
काष्टी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी एस एस सी मार्च २०२३ परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचा शुभ चिंतन समारंभ आयोजित करण्यात आला होता. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पंडित घोंगडे हे होते.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते सचिन झगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध उदाहरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करा व त्यासाठी लागणारे पडेल ते कष्ट उपसा व जीवनाचे सोने करा असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास माईक सिस्टीम भेट दिली.

आपल्या अध्यक्षिय भाषणात प्राचार्य घोंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावर्षी परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलाविषयी माहिती दिली. कलाशिक्षक सुनील शिंदे यांनी सुंदर फलक लेखन केले होते.कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सभापती अरूनराव पाचपुते, परिक्रमाच्या संचालिका सौ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेशराव भोसले, राहूल पाचपुते, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. महेजबीन पठाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा समितीचे सचिव हरिश्चंद्र शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
75 %
5.9kmh
100 %
Fri
25 °
Sat
30 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
28 °
error: Content is protected !!