वीज प्रश्नी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा – शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस

टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२६ फेब्रुवारी २०२३ :
कोळगाव व परिसरात सातत्याने विजेच्या अनियमितपणामुळे व खंडित वीज पुरवठ्यास नागरिक त्रस्त झाले असून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोळगाव शाखेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस यांनी दिली आहे.

कोळगाव शिवसेनेच्या वतीने वीज मंडळास दिलेल्या पत्रानुसार, कोळगाव व परिसरात काही आठवड्यापासून सातत्याने वीज खंडित होत असून शेतकरी, व्यावसायिक व विद्यार्थी यांच्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. पाणी असून शेतीला पाणी देता येत नाही. लहान मोठे व्यवसायिक, खंडित वीज पुरवठ्यामुळे व कमी दाबाने वीज उपलब्ध असल्याने अडचणीत आले आहेत.

सध्या इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असून त्यांना अभ्यासामध्ये विजेमुळे अडथळा निर्माण होत आहे. कोळगाव व परिसरात वीज वितरण मध्ये वारंवार अडथळा येत असून खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे घरातील व दुकानांमध्ये उपकरणे नादुरुस्त होत आहेत. या सर्व बाबींचा वीज मंडळांनी तातडीने विचार करावा अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने व कोळाई देवी जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने वीज प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रवीण खेतमाळीस, ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख चिमणराव बाराहाते व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी दिला आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.4 ° C
24.4 °
24.4 °
82 %
8.2kmh
100 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
24 °
Wed
25 °
Thu
29 °
error: Content is protected !!