टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | दि.२६ फेब्रुवारी २०२३ :
महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम करिअर कट्टा या अंतर्गत घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन स्पर्धा २०२२-२३ मध्ये श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार वितरण दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी के. जे.सोमैय्या महाविद्यालय, विद्याविहार ,मुंबई (स्वायत्त), या ठिकाणी पार पडल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉलेजच्या वतीने हा पुरस्कार प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी, जिल्हा समन्वयक प्रा.विलास सुद्रीक, प्रा. विजय इथापे , प्रा.प्रमोद परदेशी आणि प्रा.सतीश चोरमले यांनी स्वीकारला.सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार ही संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योजक आपल्या दारी व आय.ए.एस. आपल्या दारी हे दोन प्रमुख उपक्रम राबविले जातात.यामध्ये भारतातील नामवंत आय.ए.एस. अधिकारी व उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच करिअर संदर्भात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण लेखी परीक्षेची तयारी, बँकिंग परीक्षेची तयारी, विद्यार्थी संवाद कार्यक्रम, आर्थिक साक्षरता कार्यशाळा, राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत सहभाग हे उपक्रम राबविले जातात.
तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत कौशल्य वाढीसाठी नवीन कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कॉलेजमध्ये सुसज्ज असे सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले जाणार आहे.यातून ५ विद्यार्थ्यांची बँकेत , ५ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात व ६ विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी मिळाली आहे.
या पुरस्काराचे वितरण शैलेंद्र देवळाणकर संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि डॉ. नामदेव भोसले उद्योजकता व कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य, कर्नल डॉ.पिल्ले कुलगुरू सोमैय्या विद्यापीठ, यशवंत शितोळे अध्यक्ष करिअर कट्टा,महाराष्ट्र राज्य, प्राचार्या डॉ.प्रज्ञा प्रभू सोमैय्या कॉलेज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सर्व संचालक, सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी बापूतात्या नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
लोकक्रांती वृत्तांकन