टीम लोकक्रांती
कोरेगव्हान, श्रीगोंदा | दि.२७ फेब्रुवारी २०२३ :
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, बालमनावर संस्कार होतानाच समाजप्रबोधही व्हावे, त्यातून शाळेच्या विकासास हातभार लागावा यासाठी कोरेगव्हाण जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. पालकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे हे स्नेहसंमेलन आगळेवेगळेच ठरले.
शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, मराठी लोकगीते, शेतकरी गीते, तसेच समाज प्रबोधनपर नाटिका सादर करुन पालकांची शाबासकी मिळवली. यावेळी बोलताना उद्योजक अतुल लोखंडे म्हणाले की गावकऱ्यांनी रोख व वस्तुरुपाने दिलेले योगदान इतरांसाठी प्रेरणादायी आहे. यातून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा देखील भौतिक सुविधात पुढे येतील. गुणवत्तावाढी साठी याचा निश्चित उपयोग होईल.
यावेळी ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती थोरात सहशिक्षक संदीप पठारे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी आबासाहेब दळवी, पारनेरचे संचालक सूर्यकांत काळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, उद्योजक अतुलशेठ लोखंडे यांचे शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव, उपाध्यक्षा किर्ती गोंडे व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पं स. सदस्या कल्याणीताई लोखंडे, सरपंच रुकसाना सय्यद, कृषी अधिकारी प्रवीण कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या दिपालीताई शेळके, जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गौतम साळवे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब दातीर, गुरुमाऊलीचे हरिदास नवले, प्रमोद शिर्के, बाबाजी काळघुगे,भाऊसाहेेब भिंगारदिवे,नवनाथ वाळके,कैलास पाडेकर, संतोष मगर,दत्ता डोईफोडे,ज्ञानेश्वर इंगळे आदि मान्यवर ग्रामस्थ व माता पालक उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन