टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | दि.२ मार्च २०२३ :
दि.१ मार्च रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी गणेश बाजऱ्या भोसले रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हा पारगावफाटा येथे लोखंडी कोयता जवळ बाळगुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि. भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बातमीचे ठीकाणी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. पाठलाग करुन गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेतले.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पारगाव फाटा येथे जावुन खात्री केली असता एक ईसम त्याचे हातात लोखंडी कोयता घेवुन जात असताना दिसला पोलीसांची चाहुल लागताच सदर इसम हा पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाजऱ्या भोसले वय ३८ वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे हातात २००/- रुपये एक लोखंडी पात्याचा कोयता मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. नमुद कोयता बाळगणारे ईसमावर –
1)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.264/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी याचेवर दरोडा व जबरी चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) लोणावळा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 118/2016 भादवी कलम 399,396,397 मोक्का 3(1)। (II),3(4) प्रमाणे
2) बेलवंडी स्टेशन गुन्हा रजि नं 15/2016 भादवी कलम 395,397,420 प्रमाणे
3) संगमनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 70/2011 भादवी कलम 395,397,376,354,412,341 प्रमाणे
4) पिंपळगाव पोलीस स्टेशन (नाशीक) गुन्हा रजि नं 68/2011 भादवी कलम 397,394,307 प्रमाणे
5) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 13/2011 भादवी कलम 307,143,147,148,149,504,506
6)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 05/2016 भादवी कलम 316,498(अ)
आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे.गुन्हाचा तपास पो.ना/ गोकुळ ईंगावले श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पो. स.ई. समिर अभंग, स.फौ. अंकुश ढवळे, पो.ना/गोकुळ ईगावले, पो. कॉ/ अमोल कोतकर, पो.कॉ / प्रताप देवकाते, पो.कॉ/ गणेश साने, पो.कॉ/ रविंद्र जाधव यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन