छत्रपती कॉलेजच्या विद्यार्थ्याची प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नोकरीसाठी निवड

एम.एस्सी (रसायनशास्त्र) उत्तीर्ण प्रतिक नागवडे या विद्यार्थ्याची हैद्राबाद येथील नामांकित लक्ष्मीजेनकेम लि. या औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.२ मार्च २०२३ :
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील एम.एस्सी (रसायनशास्त्र) उत्तीर्ण प्रतिक नागवडे या विद्यार्थ्याची हैद्राबाद येथील नामांकित लक्ष्मीजेनकेम लि. या औषध कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

वडील संजय नागवडे (रा.वांगदरी,ता-श्रीगोंदा) हे व्यवसायाने शेतकरी आणि आई गृहिणी परंतु त्यांनी मुलाला उच्चशिक्षित करून करिअर करता सतत प्रोत्साहन आणि पूर्ण स्वातंत्र्य दिले. मुलगा प्रतिक हा दोन्ही भावंडांमध्ये वयाने मोठा आणि अभ्यासात हुशार. लहान भाऊ शिक्षण घेत आहे. परंतु कष्ट,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल आणि रसायनशास्त्र विभागामार्फत ऑनलाईन इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेल विभागातील प्रा.विलास सुद्रिक , प्रा.विजय इथापे ,प्रा. प्रविण नागवडे आणि विभागप्रमुख प्रा.सुर्यवंशी मनोहर यांनी मेहनत घेतली.

फक्त डिग्री देण्यापुरती ही संस्था नसून विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळवून देणारी ही अमृतवाहिनी झाली पाहिजे, या स्व.बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय राजेंद्र दादा नागवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. छत्रपती कॉलेजचे विविध कंपन्यांसोबत जवळपास १७ सामंजस्य करार झालेले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि पुढेही हीच परंपरा या शैक्षणिक वर्षात कायम राहणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी बापूराव नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, प्राचार्य, रसायनशास्त्र विभागप्रमुख व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!