गणपती मळ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याला २ मार्चपासून प्रारंभ.

या पारायण सोहळ्याचे हे ५१ वे वर्षे आहे

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.४ मार्च २०२३ :
श्रीगोंदा शहरातील गणपती मळा येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ आणि अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज‎ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.२ मार्च पासून भक्तीमय‎ वातावरणात प्रारंभ झाला. दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते १२ तुकाराम गाथा, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन , सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री ११हरिजागर असा सोहळा दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये कलश पूजन, वीणा ,टाळ मृदंग ,ज्ञानेश्वरी, व गाथा पुजन‎ करण्यात आले.

  • गणपती मंदिरा मध्ये संत तुकाराम महाराज,श्री संत शेख महंमद महाराजांनी वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी तुकाराम बीज साजरी करण्यात येते असे नागरिक सांगतात.

तुकाराम महाराज कथेचे‎ व्यासपीठ चालक पोपट दत्तू दांडेकर महाराज हे आहेत.‎ २ मार्च पासून या सप्ताहास‎ प्रारंभ झाला असून ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची संस्थापक अध्यक्ष दीपकजी सुद्रिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील टाळकरी म्हणून ४० विद्यार्थीनीं काम पाहत आहेत. तर संस्थेमधीलच विद्यार्थीनीं कु.ह.भ.प ऋतुजा कासार, प्राची वाजे, सोनल बोरुडे, प्रतिभा दरेकर, मनीषा जगताप, श्वेता बडे, प्रणाली कोकाटे या नामांकित बालकीर्तकर मुलींचा गजर कीर्तनाचा सोहळा चालू असून दि.८ मार्च रोजी दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. ह.भ.प स्वरसम्राट योगेश महाराज खेडकें यांचे काल्याचे‎ किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता होणार‎ आहे.या कार्यक्रमाचे आयोजन ५० वर्षांपासून गणपती मळा परिसरातील नागरिक करीत असतात.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!