कोळगाव येथील डॉ. भरत दत्तात्रय साके वय ३७ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन

कोळगावसह परिसरात शोककळा

टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.४ मार्च २०२३ :
साकेवाडी (कोळगाव) येथील शेतकरी कुटुंबातील एमबीबीएस असलेले डॉक्टर भरत दत्तात्रेय साके, वय ३७ वर्ष यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण, वडील, पाच चुलते असा परिवार आहे. कोळगाव मधील ते पहिलेच एमबीबीएस डॉक्टर होते.
डॉक्टर भरत साके हे कोळगाव येथील कोळाईदेवी विद्यालयातून गुणवत्ता यादीमध्ये पहिले आले होते. तसेच बारावीनंतर घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

त्यानंतर त्यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली व अखेरच्या श्वासापर्यंत गोरगरिबांची कमी फी मध्ये ते सेवा करत राहिले. कोळगाव मध्ये रुग्णांसाठी सर्व सोयींनी अद्यायावत असे हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर असतानाच त्यांचे रुग्णालय उभारणीचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यांच्या जाण्याने कोळगाव तसेच परिसरावर शोक काळा पसरली असून उमेदीच्या काळात त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
81 %
4.5kmh
23 %
Thu
24 °
Fri
29 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
error: Content is protected !!