घोडेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ.अनिता धर्मराज मचे यांची बिनविरोध निवड

सौ.अनिता धर्मराज मचे यांची उपसरपंच पदी बहुमताने निवड

टीम लोकक्रांती
घोडेगाव, श्रीगोंदा | दि.८ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच निवड प्रक्रिया बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी सरपंच रामदास घोडके व ग्रामविकास अधिकारी प्रतिभा डोमे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. त्यामध्ये सौ.अनिता धर्मराज मचे यांची बहुमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

उपसरपंच पदाची जागा रिकामी झाल्याने त्या ठिकाणी सौ.अनिता धर्मराज मचे यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच रामदास घोडके,ग्रामविकास अधिकारी प्रतिभा डोमे, ग्रामपंचायत सदस्य रूपचंद(दादासाहेब) दरेकर, ज्ञानदेव वाघमारे, शिवाजी डेबरे, महिला सदस्या सोनाली सचिन फटे ,मनीषा दिलीप मचे, नंदा सुरेश माळी तसेच गावातील प्रमुख मान्यवर लक्ष्मण मचे, गणपतराव निकम, रावसाहेब वाघमारे, बाळासाहेब किसन फटे, लहू डेबरे, कुंडलिक फटे, धर्मराज मचे, संतोष फटे, अजीज शेख, बाळासाहेब म्हस्के, गजानन वाघमारे, रमेश शेळके, विलास फटे, दत्तात्रय महाडिक, रामदास फटे, दिलीप मचे व इतर काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सौ.अनिता धर्मराज मचे यांची सर्वानुमते उपसरपंच पदासाठी निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा हार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या निवडीने त्यांच्यावर सर्वच स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!