टीम लोकक्रांती नंदकुमार कुरूमकर
लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा | दि.८ मार्च २०२३ :
भारतीय स्त्रियांनी संपूर्ण जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात भारतीय संस्कृतीचे जतन करत आपले अस्तित्व निर्माण केले, त्यामुळे आज दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे गौरवद्गगार प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैशालीताई काकडे ह्या होत्या.
व्यासपीठावर ज्योतीताई काकडे, मनीषाताई काकडे, कुसुम काकडे, निशा लाटे, संध्याताई काकडे, सुमन काकडे, शकुंतला लगड, रूपालीताई काकडे, सुवर्णा जठार आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य सस्ते पुढे म्हणाले की, भारतीय स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात धाडसाने सहभाग घेऊन नेत्र दीपक कामगिरी बजावली प्रामुख्याने सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी, चांदबिबी, झाशीची राणी, इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज इत्यादी कर्तबगार महिलांचा देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभले. त्यानंतर आजही महिला विविध क्षेत्रात सहभाग घेऊन उच्चपदस्थ अधिकारी बनले ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून प्राचार्य सस्ते यांनी व्यसनमुक्तीवर भरीव असे मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले
सौ उर्मिला जठार यांनी स्त्रीने संधी मिळेल तेव्हा आपलं मनोगत व्यक्त करावं स्त्रियांनी उच्च स्वप्ने पहावीत.
सौ छायाताई भोसले यांनी स्त्रियांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे सांगितले.
सौ मनीषाताई काकडे यांनी विद्यार्थिनींना मदत करण्याचे आवाहन करत स्त्रिया इतिहास घडवतात असे सांगितले.
सौ अलका साळवे यांनी समाजाकडून संविधानाकडून आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा उपयोग करावा महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक असून, आहाराचे महत्व सांगितले.
सौ शकुंतला लगड माजी ग्रामपंचायत सदस्या यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, स्त्रि व पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. महिलांनी समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करावा विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी द्यावी.
सौ मीना नगरे यांनी स्त्रि जीवनावर एक भावनिक कविता सादर केली.
याप्रसंगी राष्ट्रीय कुस्तीपटू अक्षदा भंडारी व सोनाली मंडलिक यांचाही विद्यालयाच्या वतीने नागरिक सन्मान करण्यात आला.
दरम्यान राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने मनोगत व्यक्त करत शालेय विद्यार्थ्यांनी सतत खेळात सहभाग घेऊन आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे जिद्द व चिकाटी अंगी असेल तर प्रतिकूल परिस्थिती आड येत नाही खेळाच्या माध्यमातून राज्य व देशाचे नाव अजरामर ठेवावे असे सांगून, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी सौ संध्याताई काकडे यांनी कुस्तीपटू सोनाली मंडलिक या कुस्तीपटूच्या पुढील कारकीर्दीसाठी अकराशे रुपये रोख देऊन सन्मान केला.
या भव्य जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थी महिला भगिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक विद्यालयाच्या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती नौशाद शेख यांनी केले. सूत्रसंचालन करत आभार जुनिअर कॉलेजच्या प्रा. पुष्पलता काकडे यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन