मढेवडगांव येथे चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून फोडले एटीएम;लाखोंची रक्कम लंपास

टीम लोकक्रांती
मढेवडगाव, श्रीगोंदा | दि.११ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर असलेल्या मढेवडगांव येथे काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू झालेले इंडिया नं.एक कंपनीचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान स्फोट घडवून फोडले. जिलेटिन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘एटीएम’चा डाटा मिळाल्यानंतर चोरीच्या रकमेची माहिती मिळेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पी.एस.आय समीर अभंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नगर-दौंड महामार्गावर असलेल्या मढेवडगांव येथे ‘इंडिया नं.एक’ कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरांनी एटीएमच्या दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पैशांच्या मुख्य मशिनच्या लगत स्फोट घडवून ते फोडले. स्फोट घडविण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा वापर केला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून एटीएमच्या जवळ असणारे नागरिक जागे झाले.याबाबत गावातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. बॉम्बशोधक पथक, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकानेही तपास सुरू केला आहे.

एटीएम फोडणारे तीन ते चार जण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यांनी जिलेटिन कांड्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एटीएमच्या रूममध्ये काही नोटा विखरून पडल्याचे दिसून आले.इंडिया नं.एक कंपनीचे एटीएम बाकीच्या कंपन्यांच्या एटीएमपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत असते. मात्र, तरीही एटीएम फोडण्यात आले आहे. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रात्रीच्या सुमारास एटीएम बंद करण्यात येते. एटीएम रूममध्ये सुरक्षारक्षक नेमणुकीस नसल्याने हा प्रकार घडला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची चौकशी आदी बाबींचा विचार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.3 ° C
21.3 °
21.3 °
95 %
8kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
error: Content is protected !!