मुंबई येथे चोरी करणारा आरोपी श्रागोंदा पोलीसांच्या जाळ्यात

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१५ मार्च २०२३ :
रविवार दि.१२ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिंदा ता. कर्जत येथे जाऊन कोंबींग ऑपरेशन करून आरोपीचा शोध घेऊन खात्री केली असता अॅन्टाफिल पोलीस स्टेशन मुंबई हद्दीत उघड्या घरात घुसुन चोरी करणारा आरोपी नेवस उर्फ नेवश्या रामदास भोसले रा. शिंदा ता. कर्जत हा आरोपी शिंदे ता. कर्जत येथे फिरताना दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो आरोपी पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.

सविस्तर माहिती अशी की रविवार दि.१२ मार्च रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अॅन्टाफिल पोलीस स्टेशन मुंबई हद्दीत उघड्या घरात घुसुन चोरी करणारा आरोपी नेवस उर्फ नेवश्या रामदास भोसले रा. शिंदा ता. कर्जत हा शिंदा गावात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि. भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कॅबिनमध्ये बोलावुन नमुद बातमीचे ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करुन आरोपी ताब्यात घेणे कामी सुचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिंदा ता. कर्जत येथे जाऊन कोंबींग ऑपरेशन करून आरोपीचा शोध घेऊन खात्री केली असता वरील नमुद आरोपी शिंदे ता. कर्जत येथे फिरताना दिसला . पोलीसांची चाहुल लागताच सदर आरोपी हा पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
त्या आरोपी याचेवर खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे
१) अॅन्टाफिल पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 40/2023 भादवी कलम 380 प्रमाणे,सदर आरोपीस अॅन्टाफिल पोलीस स्टेशन चे पोलीसांच्या ताब्यात दिले असुन आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पो.स.ई. समिर अभंग, स.फी. अंकुश ढवळे, पो.ना/गोकुळ ईंगावले, पो. कॉ/ अमोल कोतकर, पो.कॉ / प्रताप देवकाते, पो.कॉ/ गणेश साने, पो.कॉ/ रविंद्र जाधव, पो.कॉ/ विनायक जाघव यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
scattered clouds
33.4 ° C
33.4 °
33.4 °
39 %
5.1kmh
43 %
Sun
33 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
32 °
Thu
33 °
error: Content is protected !!