टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२५ मार्च २०२३ :
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांची ‘परिवर्तन संवाद यात्रा’ ३० मार्च ते २५ एप्रिल २०२३ दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावे व नगर तालुक्यातील काही गावे अशा प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संवाद साधून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले व २५ एप्रिल २०२३ रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे ते म्हणाले आज दि. २५ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
परिवर्तन संवाद यात्रेची सुरुवात घन:श्यामअण्णा शेलार यांच्या वडाळी या जन्म गावापासून करण्यात येणार असून प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधून वीज, पाणी, रस्ते, तसेच शेती विषयी जनतेच्या अडचणी समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. २५ एप्रिल रोजी भव्य शेतकरी मेळावा घेऊन परिवर्तन संवाद यात्रेची सांगता होणार आहे.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात चालू असलेल्या दूध भेसळ प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की हा गंभीर प्रश्न २००२ साला पासून चालू आहे त्यावेळेस अजित पवार यांनी कडक सूचना देत या दूध भेसळीबाबत कोणाची गय केली जाणार नाही असे त्यावेळी ठणकावून सांगितले होते. परंतु आज सत्ताधारी पक्षातील जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट दाखवून टीका करत आहेत त्यातील काही नेते त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्येच होते हे ते विसरले असावेत.
१९९७ साली सर्वेक्षण होऊन अंदाजपत्रक मंजुरीस दिलेली फाईल कुठे गायब झाली हे त्यांनी शोधून काढावे ज्यांनी साकळाई योजनेला विरोध केला तेच आज या योजनेचे श्रेय घेऊ पाहत आहेत साकळाई योजना ही फक्त निवडणुकांचे राजकारण झाले आहे यातून लोकांची फसवणूक चालू आहे – घन:श्याम शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष
आगामी विधानसभा लढवणार का या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले २०१९ च्या विधानसभा निवडणूकी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार शोधत होते त्यावेळी कोणी तिकीट घेण्यास इच्छुक नव्हते त्यावेळी मी उमेदवारी केली आज जनता मला गृहीत धरत आहे त्यामुळे मी आगामी विधानसभा लढवणारच आणि मला उमेदवारी मिळेल असा माझा पक्का विश्वास माझ्या पक्षाच्या नेत्यांवरती असल्याचे ते बोलताना म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी तालुका शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन