टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२० एप्रिल २०२३ :
साळवण देवी रोडला पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाया जात आहे तसेच पाईपलाईन मध्येच फुटल्या मुळे पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत या कडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शुद्ध पाण्याची मोठी योजना झालेली असताना नगरपालिकेला टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ ओढवली आहे.
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीमध्ये साळवण देवी रोड लगत पाईपलाईन फुटल्यामुळे गेली चार महिने कमी दाबाने पाणी मिळत आहे नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी याकडे डोकून पाहत नाहीत. साळवन देवी रोडच्या प्रवेशद्वारा जवळ अतिशय सुंदर अशी जाहिराती केलेली आहे. परंतु वास्तव चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. रोड लगत उकांडे झाल्याने मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे.
श्रीगोंदा नगरपरिषद साळवण देवी रोड कडे अक्षरशा दुर्लक्ष करत आहे साळवण देवी रोड मुख्य रोडच्या तोंडाशी टॉयलेटचा मयला उघड्या वर आहे त्यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी परिसरात पसरते त्यामुळे मोठे प्रदूषण होत आहे. तसेच साळवण देवी रोड लगत चिकनचे तुकडे परिसरामध्ये टाकून दिले जातात त्या ठिकाणी कुत्रे कावळे मोठ्या संख्येने असतात साळवण देवी रोड ला ड्रेनेज लाईन झालेले आहेत त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मधून पाणी दुसऱ्याच बाजूने जात आहे येता जाता नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
श्रीगोंदा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या कामाकडे लवकरात लवकर लक्ष घालून नागरी समस्या सोडवाव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना शिंदे येत्या काळात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची नोंद मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
लोकक्रांती वृत्तांकन