मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल ला स्पष्ट बहुमत

संस्था पुन्हा आमदार पाचपुते गटाकडे

टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.२४ एप्रिल २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या १२ जागेसाठी २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने ही संस्था पुन्हा आमदार पाचपुते गटाकडे कायम राहिली.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी या संस्थेची निवडणूक अत्यंत अटीतटीची पार पडली. या निवडणुकीत नागवडे गटाला सहा तर आमदार पाचपुते गटाला सहा असे समसमान उमेदवार निवडून आल्याने, या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे नूतन पदाधिकारी नेमण्यासाठी मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी मात्र नागवडे गटाने आमदार पाचपुते गटाची सत्ता रोखून धरली होती. श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी पाचपुते- नागवडे गटाला जवळपास सहा महिने संधी दिली होती. परंतु तरी देखील त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होऊ शकली नाही. अखेर श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी सहकार कायद्यानुसार संस्थेचे आर्थिक कारभार पाहण्यासाठी प्रशासक म्हणून जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी बाळासाहेब उंडे यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नेमणूक केली. विशेष म्हणजे प्रशासकांनी देखील एक वर्षभर कारभार पाहताना संस्थेचे हित जोपासत मागील आर्थिक वर्षाची १००% कर्ज वसुली करून संस्थेचे अस्तित्व व पत कायम ठेवली.

अशाप्रकारे या संस्थेमध्ये जवळपास एक वर्षभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मात्र सहकार कायद्यानुसार श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांना संस्थेची निवडणूक घेणे बंधनकारक ठरले. त्यामुळे सहाय्यक निबंधकांनी या संस्थेची पुन्हा २३ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. यावेळी आमदार पाचपुते नागवडे गट आमने-सामने निवडणुकीला उभे होते या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार पाचपुते गटाचे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला ११ तर श्री भैरवनाथ किसान क्रांती पॅनल नागवडे गटाचे एकमेव उमेदवार आप्पासाहेब महादेव कुरुमकर हे निवडून आले आहेत.

श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार व त्यांनुा मिळालेली मते पुढील प्रमाणे:- सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून मुंढेकर नारायण शिवराम ५५१, शेंडे गोरख भानुदास ५०३, जाधव अमोल रामदास ४८४, चव्हाण संतोष धनाजी ४७६, हराळ भाऊसाहेब आप्पा ४७२, कुरुमकर चमक सर्जेराव ४४७, कुरुमकर बाळासाहेब हौसराव ४४७, (आमदार पाचपुते गट), तर नागवडे गटाचे कुरुमकर आप्पासाहेब महादेव ४७१, महिला राखीव प्रतिनिधी खोडवे प्रमिला मनोज ५०७, बाबर आशा बापू ४७४, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून रंधवे संदीप विलास ५३२, तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रवर्गामधून गवते धनंजय माणिक ५२२ आदी उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेंद्र घोडके यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून तानाजी देशमुख यांनी सहकार्य केले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
80 %
8.4kmh
100 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
error: Content is protected !!