टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२८ एप्रिल २०२३ :
कोळगाव येथे नागरिकांच्या व प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाणपोई श्री कोळाई जेष्ठ नागरिक संघटना कोळगाव यांच्यावतीने सुरू करण्यात आली. मुख्य चौकातील पाणपोईचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव व आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य पोपट नलगे यांच्या हस्ते तर बसस्थानका शेजारील पाणपोईचे उद्घाटन उपाध्यक्ष भास्करराव लगड व सुभाष रणसिंग मेजर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोळगाव येथे मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्याचा अंदाज घेऊन व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे हेतूने श्री कोळाई ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने दोन ठिकाणी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघटनेचे भैरु भापकर, कैलास जगताप, रावसाहेब डूबल, संभाजी लगड, उत्तम बोरुडे, आबासाहेब गाडेकर, महेशकुमार शिंदे, अविनाश मचाले, कोंडीबा गायकवाड, सुभाष लगड ,मथुजी नलगे, चिमणराव बाराहाते, प्रवीण खेतमाळीस, विश्वनाथ लगड, संपत शिरसाठ, अविनाश साठे, राजेंद्र लगड, शरद लगड, काकासाहेब डूबल, लक्ष्मीकांत लगड, पोपट मेहेत्रे, सुदाम लगड, संदीप दिवेकर, राघू उजागरे व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सुभाष रणसिंग मेजर, कोंडीबा गायकवाड व सुभाष लगड यांनी या उपक्रमास देणगी दिली.
लोकक्रांती वृत्तांकन