टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२९ एप्रिल २०२३ :
अटीतटी च्या झालेल्या लढतीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहूल जगताप, राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, अण्णा शेलार यांच्या नेतृत्वाखाली ११जागा घेत बहुमत सिद्ध केले तर आमदार बबनराव पाचपुते व नागवडे साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनल ला ७ जागा वर समाधान मानावे लागले या निवडणुकीत नाहटा यांचे पुत्र मितेश नाहटा यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे सभापती पदासाठी ते प्रबळ दावेदार मानले जात होते.
महेश दरेकर व दत्ता पानसरे यांनी पॅनल बरोबरच वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिल्याने विजयी झाले. निवडणुकीत विजया नंतर प्रतिक्रिया देताना माजी आमदार राहुल जगताप म्हणाले दोन नेते एकत्र येऊनही आम्हाला बहुमत मिळाले भाविष्यात विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात या दोघांनी एकत्र राहावे पाहूया कोण बाजी मारेल असे नागवडे पाचपुते यांचे नाव न घेत सांगितले.
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी बाजार समिती उभारली पुढे आमदार बबनराव पाचपुते यांनी दीर्घाकाल सत्ता ताब्यात ठेवली पण या निवडणुकीत मात्र पाचपुते नागवडे यांना एकत्र यावे लागले तर नवखे राहुल जगताप यांनी साजन पाचपुते यांच्या साथीने एकहाती सत्ता मिळवली.राष्ट्रवादी काँग्रेस ची अवस्था ही मितेश च्या पराभवामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली.
विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे..
सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून,दत्तात्रय पानसरे १०४९, अजित जामदार १०१२, दीपक भोसले १०१२, नितीन डुबल ९९४, बाबासाहेब जगताप ९८६, रामदास झेंडे ९६९, भास्कर वागस्कर ९३९, महिला मतदारसंघातून मनीषा मगर, १०३४, अंजली रोडे १०३३, इतर मागासवर्ग मतदार संघातून प्रवीण लोखंडे १०५६, ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघातून प्रशांत ओगले ४४२,भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून गावडे दत्तात्रय १०२४, ग्रामपंचायत मतदार संघातून साजन पाचपुते ३९८, महेश दरेकर ३७९, आर्थिक दुर्बल घटक मधून लक्ष्मण नलगे ४४८, व्यापारी मतदारसंघातून लौकिक मेहता २६४ , अदिक वांगणे २६१, हमाल मापारी मतदारसंघातून किसन सीदनकर ५५ असे उमेदवार विजयी झाले आहेत.
यापैकी माजी आमदार राहुल जगताप, साजन पाचपुते, बाळासाहेब नहाटा व अण्णासाहेब शेलार यांच्या गटातून अजित जामदार, दीपक भोसले, नितीन डुबल ,बाबासाहेब जगताप , भास्कर वागस्कर, मनीषा मगर, अंजली रोडे, प्रवीण लोखंडे, गावडे दत्तात्रेय, साजन पाचपुते, किसन सिदनकर हे अकरा उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, आमदार बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस गटाचे दत्तात्रय पानसरे, रामदास झेंडे, महेश दरेकर ,लक्ष्मण नलगे, लौकिक मेहता, प्रशांत ओगले, अदिक वांगणे हे सात उमेदवार विजयी झाले आहेत.
लोकक्रांती वृत्तांकन