आमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेताना आम्हीं शांत बसणार नाही – दिपक भाई केदार!

श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.५ मे २०२३ :
कर्जत तालुक्यातील एका सामाजिक कार्यक्रमानिमित्त जातांना श्रीगोंदा येथे पदाधिकऱ्यांशी संघटना व्याप्ती संदर्भात बैठक करून, स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, सामाजिक न्याया साठी अनुसुचित जाती जमाती उपाय योजनेचा स्वतंत्र बजट कायदा झाला पाहिजे. या वर्षी १६४९४ कोटी रुपयांची घोषणा बजट मध्ये झाली. मोठया निधीची नुसती घोषणा केली जाते. वास्तवात हा निधी पळवला जातो किंवा वळवला जातो. त्यावर दरोडा टाकण्यात येतो.

कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, हरियाणा, पंजाब, राजस्थान राज्यात न्याय विभागाचा स्वतंत्र कायदा करून, एस सी एस टी, आर्थिक सबलता देण्याचे काम केले. ते पुरोगामी महाराष्ट्रात होत नाही हे दुर्दैव आहे. असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले.आत्ता जन जागृती करून, लुटारुंचे बुरखे फाडणार यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी नमूद केले की, खेळाडू महीला न्यायाचा आक्रोश करत असताना ज्या जंतर मंतर ने देशाला आण्णा हजारे यांची ओळख करून दिली. त्या अण्णा हजारेनां महीला आंदोलकांचा आक्रोश दिसत नाही का..? बिल्किन बानो, महीला पहिलवान, मनिषा वाल्मिकी अशा अनेक घटना घडतात मात्र, प्रधान मंत्री मन की बात मधे काहीच बोलत नाहीत.

त्याचं बरोबर जय भीम घोषणा देणे गुन्हा आहे का..? लातूरच्या उमरगा कोठ गावात पोलीस निरीक्षक बंदुकीचा धाक दाखवून बाबसाहेबांच्या जयंतीची मिरवणूक रोखतात त्यांचें निलंबन झाले पाहिजे. अशीही त्यांनी मागणी केली. बारसू रिफायनरी आंदोलकांना ऑल इंडिया पँथर सेना पाठिंबा देत आहे. नक्सलवादी , खलिस्तानी म्हणुन आंदोलनांला चिरडण्याचा केन्द्र व राज्य सरकारची सवय आहे असेही ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या स्थानिक प्रश्नांना उत्तर देताना सांगीतले की, श्रीगोंदा तालुक्यात मागासवर्गीय, आदिवासीं समाजावर अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तालुक्यांत आदिवासीं महिलांना नागडं करून मरण्याची भाषा वापरतात. ॲट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला किंवा आग्रह केला तर, गैर संविधानिक आंदोलन करण्यात येतात.आणि तालुक्यात वाढत चाललेले अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली.

बापू माने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा केदार यांनी निषेध केला असून, यातील आरोपी तात्काळ अटक करत. बापू माने यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अमर घोडके, तालुकाध्यक्ष संजय रणशिंग, नितिन शिंदे, योगेश गंगावणे, अक्षय आठवले, अभिजित सोनवणे, अनिल गंगावणे, विलास कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!