मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांची सर्वानुमते निवड!

टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.७ मे २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख भानुदास शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी नारायण शिवराम मुंढेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरम्यान मागील पंधरा दिवसांपूर्वी या संस्थेची अटीतटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल व किसान क्रांती पॅनल मध्ये लढत झाली. त्यामध्ये श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल ला ११ तर किसान क्रांती पॅनल ला एक जागा मिळाली. त्यामुळे ही संस्था पुन्हा आमदार पाचपती गटाच्या ताब्यात राहिली.

नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र घोडके यांच्या उपस्थितीत सात मे रोजी दुपारी चार वाजता नूतन संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी संचालक गोरख भानुदास शेंडे व उपाध्यक्ष पदासाठी नारायण शिवराम मुंढेकर हे दोनच अर्ज आल्याने सर्वानुमते या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दोन्हीही अध्यक्ष, उपाध्यक्ष हे आमदार पाचपुते गटाचे आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख शेंडे यांना सूचक म्हणून संचालक चमकराव कुरुमकर अनुमोदक संचालक संतोष चव्हाण यांनी दिले तर उपाध्यक्ष नारायण मुंढेकर यांना सूचक म्हणून संचालक अमोल जाधव यांनी तर अनुमोदक संचालक भाऊसाहेब हराळ यांनी दिले.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी या सेवा संस्थेची एक वर्षातच पुन्हा फेरनिवडणूक झाल्याने या निवडणुकीत पुन्हा आ. पाचपुते- नागवडे गट आमने सामने आले होते. गेल्या वर्षी १२ जागेसाठी झालेल्या या संस्थेच्या निवडणुकीत आमदार पाचपुते गटाला सहा तर नागवडे गटाला सहा जागा असे समसमान जागा निवडून आल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर त्यावेळी एकमत झाले नाही त्यामुळे या निवडीवर मोठा पेच निर्माण झाला होता सहकार कायद्यानुसार संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली होती.

एक वर्ष या संस्थेवर प्रशासकाने कामकाज पाहिल्यानंतर पुन्हा या संस्थेची नियमानुसार पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये आमदार पाचपुते गटाला ११ तर नागवडे गटाला १ जागा मिळाली. आणि ही संस्था पुन्हा आमदार पाचपुते यांच्या गटाकडे आली. नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेंद्र घोडके यांनी कामकाज पाहिले त्यांना संस्थेचे सचिव तानाजी देशमुख यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
71 %
9.6kmh
100 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
29 °
error: Content is protected !!