नागवडे कारखान्याचे तांत्रिक अडचणीमुळे थोडे पगार थकित असल्यामुळे कृपया कोणी त्याचे राजकारण करू नये – कामगार युनियन सरचिटणीस काॅ. आनंदराव वायकर

लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून संस्थेची बदनामी करू नये असे आवाहन कामगार युनियनचे सरचिटणीस काॅ. आनंदराव वायकर यांनी केले

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२६ मे २०२३ :
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे काही तांत्रिक अडचणीमुळे थोडे पगार थकित असल्यामुळे कृपया कोणी त्याचे राजकारण करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून संस्थेची बदनामी करू नये असे आवाहन कामगार युनियनचे सरचिटणीस काॅ. आनंदराव वायकर यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कॉम्रेड वायकर म्हणाले की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखाना व्यवस्थापनाने कामगारांचे यापुर्वी कधीही पगार थकविलेले नाहीत. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी पन्नास वर्ष कामगारांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देऊन न्याय दिलेला आहे. तोच वारसा विद्यमान चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळाने चालविलेला असून नागवडे कारखान्यात कधीही कामगारांवर अन्याय केलेला नाही. शासनाने सन २०१४ मध्ये कामगार प्रश्नावर नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीत स्व. बापूंनी व सन २०२० मध्ये राजेंद्र दादा नागवडे यांनी कामगार प्रश्नावर अतिशय सकारात्मक भूमिका मांडून कामगारांना चांगल्या सवलती देण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. या दोन्ही कराराची अंमलबजावणी सर्वप्रथम नागवडे कारखान्याने केलेली असून त्यातील फरकाची रक्कमही देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे.

प्रतिवर्षी मे ते एप्रिल या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून कारखान्यामार्फत त्यांचा सन्मान करण्याची परंपरा स्व. बापूंनी ३५ वर्षांपूर्वी सुरू केलेली होती ती कारखाना व्यवस्थापनाने आजही चालू ठेवलेली आहे. मागील वर्षी कामगार युनियन आणि कारखाना व्यवस्थापन यांच्या समन्वयाने शंभर पेक्षा अधिक कामगारांना सेवेत कायम करण्यात येऊन त्यांना नियमानुसार पगार वाढीचा लाभ देण्यात आलेला आहे. फंडाचा भरणा सुद्धा दरमहा नियमितपणे कारखान्याने केलेला आहे. स्थानिक पातळीवर व्यवस्थापन व युनियन यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय असून दिनांक १७ रोजी झालेल्या समक्ष चर्चेमध्ये दोन-तीन दिवसात पगार करण्याचे आश्वासन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिलेले असून अल्पावधीत सर्व सुरळीत होईल याचा आम्हाला विश्वास आहे. सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची उपदानाची रक्कम कारखाना वेळोवेळी अदा करीत आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या कामगारांचे पगार थकीत आहेत. काही कारखान्यांचे आठ ते दहा महिन्यापर्यंतचे पगार थकित आहेत. असे असताना सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे कामगारांचे पगार थकीत असल्याचे कोणी राजकारण करू नये व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून संस्थेची बदनामी करू नये असे आवाहन कॉम्रेड वायकर यांनी केले आहे. यावेळी कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!