बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत गांज्या सह लाखोंचा मुद्देमाल जप्त; बेलवंडी पोलीसांची मोठी कारवाई!

बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत अमली पदार्थ गांज्या ची वाहतुक करताना एका आरोपी कडून करुन ६, २४,०९०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त - बेलवंडी पोलीसांची कारवाई

टीम लोकक्रांती
बेलवंडी, श्रीगोंदा | दि.३१ मे २०२३ :
दि.३० मे रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत अमली पदार्थ गांज्या जवळ बाळगुन तीची वाहतुक करताना एका आरोपी विरुदध कारवाई करुन ६, २४,०९०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करत बेलवंडी पोलीसांनी मोठी कारवाई केली.

या बाबद अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांनी मे-२०२३ च्या क्राईम मिटींगमध्ये दिलेल्या सक्त आदेशाच्या अनुशंगाने संजय ठेंगे पोलीस निरीक्षक बेलवंडी पोलीस स्टेशन कारवाई करत असताना माहिती दिली की आम्हाला काल दि.३०.०५.२०२३ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर अवैध दारु, व बनावट हत्याराची चोरटी वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही पो.नि. संजय ठेंगे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना या ठिकाणी पंचासह जावुन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश देवुन त्यांना ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर पिंपळगाव पिसा आठाचा मळा येथे रवाना केले असता पोलीस अधिकारी व कर्मचारी हे प्रत्येक संशयीत वाहनांना थांबवुन त्याची तपासणी करत होते

तपासणी करत असताना दि. ३०.०५.२०२३ रोजी सायंकाळी १६.३० वा.चे सुमारास एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी क्र एम एच ०१ ए एल १२३४ अशी आली असता त्या गाडीस थांबवुन त्यात बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा असे सांगितलेने त्याचे गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये मागील सिटच्या खाली गांजाचे खाकी रंगाचे सात पुडे ७ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे ७४,०००/-रु किंमतीचे तसेच ५,५०,०००/- रु किंमतीची एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी क्र. एम एच ०१ ए एल १२३४ असा एकुण ६,२४,०९०/- रु किंमतीचा मुददेमाल मिळुन आला असुन सदर बाबत बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा याचे विरुदध एन.डी.पी.एस.अॅक्ट १९८५ चे कलम-८ (C), २० (b)(ii) B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पो.स. ई. गाजरे हे करत आहेत.

तरी बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील जनतेला बेलवंडी पोलिसांनी कडून आव्हान करण्यात येते की, कोणी अवैध दारु,गांजा व बनावट हत्याराची चोरटी वाहतुक करत असल्यास बेलवंडी पोलीस
स्टेशन येथे संपर्क करावा.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत विवेकानंद वाखारे, यांचे मागदर्शनाखाली पो. नि. श्री. संजय ठेंगे, पो.स.ई.गाजरे, स.फी.आर.टी. शिंदे, पो.हे.कॉ. हसन शेख ,पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर, चा.पो.हे.कॉ.भाऊ शिंदे, पो.कॉ.विनोद पवार, पो.कॉ. संदिप दिवटे, पो.कॉ, कैलास शिपनकर, पो.कॉ. सतिष शिंदे, पो.कॉ.भांडवलकर, म.पो.ना.वलवे,म.पो.कॉ.घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत येथील पो.हे. कॉ/ प्रकाश शिंदे, पो.कॉ. इरुफान शेख यांनी केली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!