UPI पेमेंट करताना घ्या ही काळजी; टाळा आर्थिक नुकसान..! अनेक लोकांनी केली एकच चूक..!

सुरक्षित UPI पेमेंट साठी चुकूनही UPI PIN दुसऱ्यासोबत शेअर करू नका..!

लोकक्रांती ऑनलाइन
Online UPI Fraud : मागील काही वर्षांमध्ये ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे छोट्या मोठ्या दुकानांनी सुद्धा यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध झाली आहे दुकानांमध्ये क्यूआर कोड सर्रास लावलेले दिसतात डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत देशात UPI पेमेंट वाढत आहे. मात्र यासोबतच यूपीआयच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. २०२२ मध्ये देशभरात UPI फसवणुकीची नव्वद हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात यू पी आय अॅपमध्ये काहीही नादुरुस्ती नव्हती व बँक खातेही हॅक झाले नव्हते तर फक्त या वापरकर्त्यांच्या चुकीमुळे फसवणुकीच्या या घटना घडल्या आहेत. ऑनलाइन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी, सुरक्षित UPI पेमेंट कशे करावे याची सविस्तर माहिती आपण पाहूयात.

चुकूनही UPI PIN दुसऱ्याबरोबर शेअर करू नका

आतापर्यंत जवळपास बहुतांश लोकांची फसवणूक UPI PIN शेअर केल्यामुळे झाली आहे. जनहितार्थ जाहिराती अनेकदा आम्हाला आमचा UPI पिन शेअर करू नका असे सांगतात, तरीपण अनेक लोक अजूनही ही चूक करतात. पैसे काढण्यासाठी अनेक वेळा लोकांना UPI पिन मागितला जातो, पैसे काढण्यासाठी तुम्हाला पिन टाकण्याची किंवा QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. लक्षात घ्या की दुसऱ्याला पेमेंट करतानाच तुम्हाला पिन टाकावा लागेल. त्यामुळे एखाद्याला पैसे द्यायचे असतील तरच UPI PIN ची आवश्यकता असते अन्य कुठल्याही व्यवहारात तुम्हाला पिन वापरण्याची आवश्यकता नाही.

UPI व्यवहार करताना अचानक तुमच्या नेटवर्क मघ्ये बिघाड झाल्यास PUBLIC Wi-Fi वरून UPI द्वारे पेमेंट करणे टाळा

काही वेळा मोबाईल मधील इंटरनेट नेटवर्क मध्ये बिघाड होतो आणि अश्यावेळी सार्वजनिक Wi-Fi वापरून UPI पेमेंट करणे शकतो टाळा. अशा वेळी तुमचा फोन हॅक होण्याचा धोका जास्त असतो. सार्वजनिक Wi-Fi वापरून तुमचा फोन हॅक झाल्यावर हॅकर्स तुमचे बँकिंग तपशील देखील मिळवू शकतात. अशा परिस्थितीत या प्रकारच्या Wi-Fi चा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक Wi-Fi वापरून UPI व्यवहार करणे शक्यतो टाळा.

UPI व्यवहारात तांत्रिक अडचण आल्यास गुगल वर CUSTOMER CARE NUMBER शोधून त्यावर कॉल करू नका

काही वेळा UPI व्यवहारादरम्यान काही तांत्रिक अडचणी येतात. अधिक खबरदारीसाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाणे चांगले वेळ गेला तरी चालेल पण ही गोष्ट कधीही योग्य ठरेल नुकसान होणार नाही व तुमचे पैसे सुरक्षित राहतील. परंतु अशावेळी लोक लगेच गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च करतात. मात्र यातूनही लोकांची फसवणूक होते. सायबर गुन्हेगार गुगलवर खोटे ग्राहक सेवा क्रमांक देतात त्यामुळे अशा नंबरवर कॉल केल्यास घोटाळे होऊ शकतात. त्यामुळे बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ग्राहक सेवा क्रमांक मिळवणे आवश्यक आहे.

UPI संदर्भात बँकांकडून दिलेल्या सूचनांचे पालन करा

UPI पेमेंट सुविधा पुर्णतः सुरक्षित आहे फक्त काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार कडून जनहितार्थ जाहिराती दाखवल्या जातात. मोबाईल वरती कुणालाही UPI PIN शेअर करू नका असे मेसेजेस वारंवार पाठवून बँक ग्राहकांना वारंवार सतर्क करत असते. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आधी बँकेशी संपर्क करणे योग्य ठरते व आर्थिक नुकसाना पासून बचाव होऊ शकतो.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
57 %
4kmh
100 %
Fri
28 °
Sat
25 °
Sun
30 °
Mon
28 °
Tue
28 °
error: Content is protected !!