महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या विरोधात टिळक भोस यांच्या रूपाने हिरा सापडला – दशरथ सावंत

टिळक भोस यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला प्रथमच सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती पाहण्यास मिळाली..!

लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.९ जुलै २०२३ : श्रीगोंदा तालुक्यात भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, कामगार यांची चूल विझू देणार नाही. राज्याच्या राजकारणातील अनेक नेते मी घडवली असून महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारा हिरा टिळक भोस यांच्या रूपाने सापडला असल्याचे मत बी. आर. एस.चे उत्तर महाराष्ट्र समन्वयक दशरथ सावंत यांनी सांगितले. श्रीगोंदा तालुक्याचे समन्वयक टिळक भोस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी बी. आर. एस.चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच टिळक भोस यांच्यावर प्रेम करणारे विविध पक्षीय पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले की, श्रीगोंद्याच व माझं अनेक वर्षांपासून नात आहे. आज माझे वय ८५ वर्षीय असले तरी टिळक सारखा कार्यकर्ता घडविणे व त्याच्या पाठीशी उभा राहणे मी कर्तव्य समजतो. अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी लवकर आल्याने मला अनेक नगरसेवक,  सरपंच,  चेअरमन अशा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी संवाद करता आला. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन टिळकची जनतेसाठी असणारी तळमळ त्यांच्याशी झालेल्या संवादातून मला समजली. त्यामुळेच टिळकने कमवलेली मानसं त्याला आयुष्यभराची साथ देत आहेत.

राज्यांत सध्या राजकीय समीकरण दोलायमान आहे. याच कारण भारत राष्ट्र समिती आहे. कारण टिळकसारखे अनेक समन्वयक आमच्या पक्षाचं काम गावगावत लोकांना समजून सांगत आहेत. त्यामूळे तुलना होते व लोकांना नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. त्याचा परिणाम राज्यात भाजपा, आघाडी यांचं एकत्रित ट्रिपल इंजिन सरकार होण म्हणजे फक्त सत्ता  टिकविण्यासाठीचा केलेला केविलवाणा प्रयोग आहे. यात लोकांचं हित होणार नाही.
तेलंगणा येथे सामान्य माणूस केंद्रित करुन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लोकप्रिय विश्वासू असे तेलंगणा मॉडेल सबंध भारतातील जनते पुढे ठेवले आहे. मुख्यमंत्री यांनी रस्ते, लाईट, पाणी, वीज, आरोग्य, प्रशासकीय सेवा यांचा सामजिक समतोल राखत अल्पावधीत तेलंगणा देशात एक नंबर केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण लोकप्रिय योजना मधून शेवटच्या घटकापर्यंत सरकारचा फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या पक्षाला थेट जोडली जात आहे. याचा परिणाम आगामी सर्व निवडणुका मधून दिसणार असल्याचे मत सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. माझ्यावर प्रेम असणाऱ्या अनेक लोकांची उपस्थिती हि च माझ्या कामाची पावती आहे. या ऋणातून उतराई होण्याकरिता दर सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर झोपडी टाकून मदत केंद्र सुरु करणार असल्याची प्रतिक्रिया भोस यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा भोस यांनी तर आभार संदीप कुनगर यांनी मानले.

प्रथमच सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती

टिळक भोस यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सर्वधर्मीय धर्मगुरूच्या हस्ते गरिबांची चूल पेटवून करण्यात आले. यावेळी हिंदू महानुभव पंथाचे महंत आचार्य अशोकराज अमृते शास्त्री, ख्रिश्चन धर्माचे पास्टर इंगळे सर, मुस्लिम धर्मीय मौलाना अब्दुल जकाते, जैन धर्मीय दिलीप मेथा, बौद्ध धर्मीय बौद्धाचार्य आनंद घोडके यांनी सर्वांनी धार्मिक प्रार्थना करत ग्रंथ, बायबल, कुराण शरीफ, त्रिपिटक, व पुस्तके देऊन शुभेच्छा दिल्या व सामजिक एक्य, दया, प्रेम, करुणा, शांती, आणी उन्नतीचा संदेश दिला. आगळ्या वेगळ्या उपक्रमा बद्दल सर्वांनी टिळक यांचं कौतुक केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!