कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील तिघांचा मृत्यू..! तीनजण गंभीर जखमी..! तळेगाव ढमढेरे नजीक झाला अपघात..!

लोकक्रांती Online
पुणे : दि.५ सप्टेंबर २०२३ : तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे टेम्पो व कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर तीन जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघाताची भीषणता एवढी होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

घटनास्थळ व शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे भरधाव वेगात असलेल्या टेम्पो (एमएच १६ सीडी ४७४२) व स्विफ्ट कार (एमएच १२ एसयू ५६५९) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्विफ्ट कारमधील कविता बोरुडे (वय ४०), योगिता बोरुडे (वय ४०) व कारचालक राजू शिंदे (वय २५ वर्षे, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील किशोरी बोरुडे (वय १७) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे व श्रीराम बापूराव मांडे असे तिघे जखमी झाले आहेत. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.8 ° C
23.8 °
23.8 °
78 %
7.3kmh
100 %
Mon
24 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
28 °
Fri
30 °
error: Content is protected !!