लोकक्रांती Online
श्रीगोंदा दि.१३ सप्टेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या आदेशानुसार दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे यांनी दिली या शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर टीम अस्थिभंग, अल्पदृष्टी, मतिमंद, मूकबधिर, कर्णबधिर यांची तपासणी करणार आहे तसेच श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर कर्मचारी यासाठी यासाठी सज्ज असून प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील गरजू दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिराला राज्याध्यक्ष बापूराव काळे, जिल्हा अध्यक्ष एडवोकेट लक्ष्मणराव पोकळे, उत्तरजिल्हाध्यक्ष मधुभाऊ घाडगे, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, जिल्हा सचिव हमीदभाई शेख, श्रीगोंदा अध्यक्ष हरिभाऊ खामकर, श्रीगोंदा तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर सोमनाथ देवकाते, उपाध्यक्ष सुरेश गलांडे, शहराध्यक्ष सचिन तोडकर, दिलीप मुथा, शहर कार्याध्यक्ष शशिकांत आंधळे, गणेश कळसकर, नंदू होळकर व इतर पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणार आहेत अशी माहिती पोकळे यांनी दिली.
या शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे यांनी सर्व दिव्यांग बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आपण या शिबिरासाठी येताना ओरिजनल कुपन व ओरीजनल आधार कार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो व या कागतपत्राच्या झेरॉक्स कॉपी घेऊन १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दिनांक येऊन आपली दिव्यांग तपासणी करावी असे आवाहन श्रीगोंदा प्रहार अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.