गणेशोत्सव व ईद- ए – मिलाद सणाचे अनुषंगाने अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या श्रीगोंदा येथील शांतता बैठकीत महत्वाच्या प्रतिबंधात्मक सूचना..!

लोकक्रांती Online
श्रीगोंदा दि.१४ सप्टेंबर २०२३ :
आज गुरुवार दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक सभागृहात अगामी होऊ घातलेल्या गणेशोत्सव व ईद- ए – मिलाद सणाचे अनुषंगाने शांतता समितीची बैठक श्रीगोंदा पोलीस स्टेशन व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या माध्यमांतून आयोजित करण्यात आली.

या बैठकीत पोलीस अधिक्षक, अहमदनगर राकेश ओला यांचे अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे , तहसीलदार मिलिंद कुलथे , पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , शिंदे मॅडम नगरपरिषद श्रीगोंदा, एम.एस.ई.बी.अधिकारी व श्रीगोंदा तालुक्यातील हिंदु, मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येने उपस्थितीत होते..

यावेळी तालुक्यातील नागरिकांनी नमूद सणांच्या निमित्ताने आपल्या भूमिका मांडल्या. यात बबलू भाऊ जकाते, प्रशांत गोरे, पत्रकार विशाल चव्हाण, प्राध्यापक बाळासाहेब बळे, नंदकुमार ताडे (शिवसेना), मनोहर पोटे (नगरसेवक), घनःश्याम अण्णा शेलार (बिआरएस), बाबसाहेब भोस (जेष्ठ नेते), राजेंद्र नागवडे (चेरमन, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना), बबनराव पाचपुते (आमदार),

यावेळी सणांच्या निमीत्ताने निर्माण होणाऱ्या विविध अडचणी आणि संभाव्य समस्यांचा आढाव घेण्यात आला. विजेचा प्रश्न, DJ च्या आवाजाबाबत सूचना, आनंद साजरा होत असताना दुर्घटना होणारं नाही याची काळजी, प्रशासकीय कार्यालया समोरं होणाऱ्या विशिष्ठ समाजाच्या लोकांच्या जथ्याना आवर घालावा, सामजिक सलोखा आबादित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कोणतेही गालबोट लागणार याची काळजी, रेकॉर्ड वरील गुन्हेगार व विघ्न निर्माण करणारे इसमांना प्रतिबंधित सूचना देण्या बाबत चर्चा झाली.

या बैठकीला राकेश ओला यांनी संबोधित केले.. यावेळी त्यांनी सांगितले की, ईद मिलाद ची मिरवणूक दुसऱ्या दिवशी करण्याच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. DJ मुळे होणारे हानिकारक परीणाम लक्षात घेता DJ चे दोन साऊंड चा वापर करावा.. मार्गदर्शक निकशाची अंबलबजावणी करण्यात येणार आहे. वाद्य व विज कनेक्शन रीतसर करावा, देखावे धार्मिक भावना दुखावणारे नसावेत, लहान मुलांना विसर्जन ठिकाणी जाऊ देऊ नये, मंडळात सीसीटीव्ही बसवावेत, व्यसन करणारे लोकं मंडळात समाविष्ट करून घेऊ नये, स्पिकरचा आवाज मर्यादित ठेवावी, पोलिसांशी संपर्क साधुन उस्तव साजरा करावा, सामजिक सलोखा आणि भाईचारा राखावा पोलिसांना सहकार्य करावा असे अवाहन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी यावेळी नमूद केले.

स्थानिक पोलीस प्रशासनाने यावेळी प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रसंचालन पत्रकार दत्ताजी जगताप यांनी केले. आभार बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
82 %
7.1kmh
93 %
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
Fri
27 °
error: Content is protected !!