लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२६ सप्टेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात रेल्वेगेटच्या मोरीजवळ महादेवाडी कडे जाणाऱ्या रोडच्या पुलाजवळ एका खड्डयामध्ये दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा चेहरा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीचे वय साधारण ३५ ते ४० दरम्यान आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत वयक्तिचा दोरीने गाळा आवळून खून करून ओळख पुसण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी सदर व्यक्तीचा चेहरा जाळून टाकल्याचे यावेळी निदर्शनास आले.
सदर घटनेतील खूना मागील सर्व गोष्टींची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे कारण घटनेतील मृत व्यक्तीचा चेहरा जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणे अवघड असणार आहे. पोलिस तपासानंतर पुढील सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.