श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेड जिल्हा पुनर्गठन – पुनर्बांधणी बैठकीचे आयोजन..!

"अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला" या मोहिमे अंतर्गत संभाजी ब्रिगेड कडून अर्थकारणाची चळवळ सुरु; तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर..!

लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२१ ऑक्टोबर २०२३ :
महाराष्ट्रातील वैचारिक व आक्रमक पुरोगामी संघटना अशी ओळख असणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीच्या पुनर्गठन-पुनर्बांधणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगोंदा येथील तुळशीदास लॉन्स याठिकाणी दि.२२ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे, प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, प्रदिप कणसे, सचिन सावंत देसाई, श्याम पाटील, शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र दातीर, जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

संभाजी ब्रिगेडने सध्या अर्थकारणाची चळवळ सुरु केली असून राज्याच्या वेगवेगळ्या भागात बिझनेस कॉन्फरन्स घेऊन तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला आहे. “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना परदेशातील नोकऱ्यांची संधी व त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून आजतागायत आठ हजारांहून अधिक तरुणांना बाहेरच्या देशात नोकरीसाठी पाठवण्यात आले आहे. केवळ आरक्षणाने समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत ही भूमिका घेऊन तरुणांना उद्योग, व्यवसाय, आयात-निर्यात, इत्यादि क्षेत्रात पुढे आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून प्रबोधन केले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीगोंदा येथील अरविंद कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.अशी माहिती अरविंद कापसे यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!