आढळगाव मध्ये एक गाव एक गणपती मूर्ती स्थापना; सर्वधर्म समभावाचे प्रतीक!!

टीम लोकक्रांती : आढळगाव दि. ०१ सप्टेंबर २०२२ : दि.३१ ऑगस्ट रोजी आढळगाव ता.श्रीगोंदा येथे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत आपली १७ वर्षे ची अखंड परंपरा जपत जय बजरंग तालिम गणेश मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता तालिम चे संस्थापक अध्यक्ष वस्ताद पै.दिपक नाना भालेराव यांच्या हस्ते सहा फूट उंच अशा भव्य दिव्य गणेश मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली.

या समाजामधील धार्मिक तेड तसेच जातीय विषमता दुर करण्यासाठी गणेश मंडळाच्या वतीने हा हिंदु- मुस्लिम ऐक्याचा उपक्रम राबवला जातो.हा उपक्रम या महाराष्ट्रात नक्कीच ऐक आदर्श ठरेल, असे मत मंडळाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले.

यावेळी तालीम चे वस्ताद पै.दिपक भालेराव, सरपंच शिवप्रसाद उबाळे, भाजप अल्पसंख्यांक चे जिल्हा उपाध्यक्ष जावेद इनामदार,आ.निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी,डॉ.संतोष शिंदे,सेवा संस्थेचे संचालक पै. माऊली उबाळे,शामभाई इनामदार,मास्टर संदीप शिंदे,पत्रकार सचिन शिंदे, पै.किरण बंड,ज्ञानेश्वर डांळीबे,पै.संग्राम भालेराव,पै.ईश्वर मेहेत्रे, पै.गणेश गाढवे,पै.अकबर तांबोळी,पै.अमोल सोनवणे,पै.योगेश उबाळे,पै.शरद सोनवणे,इर्शाद इनामदार,पै.अभिषेक सोनवणे,समिर तांबोळी,सलमान तांबोळी तसेच मंडळा चे युवा कार्यकर्ते व गणेश भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत: (पत्रकार सचिन शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!