लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१० डिसेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुका शिव आरोग्य सेनेची तालुका व शहर कार्यकारणी नगर येथे दि.९ डिसेंबर रोजी जाहीर शिवसेना उपनेते साजन पाचपुते शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र नगर शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक योगीराज गाडे शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे मराठवाडा सचिव मकरंद राजहंस आरोग्य सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी आरोग्य सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी रावसाहेब डांगे तालुकाप्रमुख पदी संभाजी घोडके तालुका उपप्रमुख पदी ओमकार शिंदे शहर प्रमुख पदी दिलीप आनंदकर तालुका सचिव पदी राजू तोरडे शहर संघटक पदी सागर खेडकर शहर सचिव पदी सुदाम मखरे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल तालुक्यामधून विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे
शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची सेवा या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये यांच्या हातून होणार आहे तरी शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या धर्तीवर हे नवनिर्वाचित पदाधिकारी काम करतील यावेळी शाखाप्रमुख देविदास तोरडे शिवसैनिक गणेश कांबळे व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.