लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१४ डिसेंबर २०२३ :
मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC) येथील डॉक्टर श्रीनिवास सारूक यांचे आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांशी वागणुक आणि वर्तणूक चांगली नाही यांच्या तक्रारी वेळोवेळी गावातील लोकांकडून आणि आरोग्य केंद्रात येणाऱ्या आसपासच्या लोकांकडून आल्या होत्या.रुग्णाची अडवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या सोबत उद्धट वागणूक करणाऱ्या मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे निलंबन करण्याची संभाजी ब्रिगेडने मागणी केली आहे अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास संभाजी ब्रिगेड टाळे ठोकणार असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
हे डॉक्टर लोकांना नीट चेक करत नाहीत इंजेक्शन औषधे देत नाहीत सलाईन सुद्धा देत नाहीत यांचे म्हणणे आहे की आपण लोकांना सलाईन इंजेक्शन दिले की लोक कायमच आपल्याकडे येतील त्यांना आपण सुविधा द्ययाच्या नाही. माझ्यावर मोठ्या मंत्र्यांचा आणि जिल्हा हेल्थ ऑफिसर चा हात आहे अश्या प्रकारच्या धमक्या देऊन तुम्हाला काय करायचे कुणाकडे माझी तक्रार करायची असे आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना हे सांगत असतात.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात आपूलकीचे नाते असते रुग्ण डॉक्टरला देवा समान मनात असताना हे डॉक्टर त्यांच्या सोबत गैरवर्तन करतात अशी रुग्णांकडून सतत तक्रारी येत आहेत.याधी याला तहसीलदार हेमंत ढोकले आणि तालुका आरोग्य अधिकरी सौ.डांगे मॅडम यांच्याकडून वर्तवणूक सुधारण्यासाठी वेळ आणि ताकीत देण्यात आली होती.महिना होऊन सुद्धा यांच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही याने पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डांगे मॅडम आणि तालुका गटविकास अधिकरी राणी फराटे मॅडम याना निवेदन देण्यात आले.यावर दोन दिवसात चौकशी करण्यात येईल आणि संबंधित डॉक्टर वर कारवाई करण्याचे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका गटविकास अधिकारी यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष(शेतकरी आघाडी) संग्राम देशमुख यांना दिले आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,तालुकाध्यक्ष नानाजी शिंदे,विजय वाघमारे,योगेश देशमुख,माऊली कण्हेरकर,बाप्पू गांगर्डे,अमोल घोडके उपस्थित होते.