लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२३ डिसेंबर २०२३ :
केंद्र शासनाच्या लोकशाही विरुद्ध कृत्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी यादव यांना दि.२२ रोजी निवेदन सादर केले भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून काही तरुणांनी लोकसभेमध्ये प्रवेश केला ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे याबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेमध्ये निवेदन करणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसं केलं नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्रीनी निवेदन सादर करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या १४९ खासदारांना निलंबित करून भाजप सरकारने भारतीय लोकशाहीची हत्या केलेली आहे ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आहे म्हणून याच्या विरोधामध्ये निषेध करण्यासाठी श्रीगोंदा या ठिकाणी निषेध म्हणून निवेदन सादर केले.
या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी निवेदन सादर केले यावेळी कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, भाऊसाहेब नेटके, रसाळ सर, संदीप औटी, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब उर्फ धर्मनाथ काकडे, श्रीगोंदा शहराध्यक्ष मच्छिंद्र सुपेकर, नगरसेवक सतीश मखरे सर, चेअरमन पोपटराव बोरुडे, मुकुंद सोनटक्के, बारा बलुतेदार तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे, नगरसेवक अशिफभाई इनामदार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.