लोकक्रांती
श्रीगोंदा, दि २३ डिसेंबर २०२३ :
दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व घोडेगाव उपकेंद्र या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या विविध तक्रारीच्या संदर्भात घोडेगाव येथील नागरिकांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून उपोषणकर्त्या पल्लवी शेलार यांच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या.
श्रीगोंदा आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यक्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाच्या वतीने काम करण्यात येते यासाठी शासनाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये डॉक्टर नर्स अशा सेविका अशा स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रत्येक घरातील लहान बालके व इतर सदस्यांचा आरोग्य समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी शासन दरवर्षी हजारो कोटीचे बजेट सामान्य च्या आरोग्यासाठी वापरले जाते परंतु या बजेट मधून राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा नक्की सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात का हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. शासनाकडून हजार कोटीच्या निधीमधून घेण्यात येणारे गोळ्या औषधे नेमणूक करण्यात येणारे डॉक्टर मोफत वाटण्यात येणारे साहित्य हे नक्की लोकांपर्यंत पोहोचतात की नाही हे पाहणारी यंत्रणा शासनाकडे नसल्याचे आजच्या दिवशी पाहण्यास मिळाले.
जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले आहे या उपोषणामध्ये उज्वला मचे, लता शिंदे, सुनीता बनकर, रोहिणी राऊत, मुमताज मुलानी, कविता सिदनकर, योगिता मोरे यांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.