श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात शंभर वर्षाच्या वीर जवान पत्नी जिजाबाई कुरुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

टीम लोकक्रांती

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्या लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वीर जवानांच्या पत्नी जिजाबाई माधवराव कुरुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. दरम्यान लिं

पणगाव येथील वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव गोविंद कुरुमकर हे देश स्वतंत्र्यापूर्वी 1917 रोजी सैन्य दलात भरती झाले. त्यावेळी देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. 1945 रोजी दुसरे महायुद्ध झाले होते. त्या महायुद्धात वीर स्वातंत्र्य सैनिक माधवराव कुरुमकर शौर्य गाजवत युद्धामध्ये सहभाग घेतला होता. अशा या प्रतिकूल परिस्थितीत वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांनी देशाची जवळपास 24 वर्षे सेवा केली. आपल्या भारत मातीशी प्रामाणिकपणे राहून कुरुमकर यांनी देश सेवेसाठी यांनी अहोरात्र सैन्य दलात उत्कृष्टपणे कामगिरी बजावली होती. त्यांचे गाववासीयांना स्मरण होणे सहाजिकच असल्याने सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बिभिशन नागवडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त वीर स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांच्या पत्नी जिजाबाई कुरुमकर वय 100 वर्ष यांना स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण देऊन ध्वजारोहणास उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनी देखील ती मान्य करत ध्वजारोहणास उपस्थित राहिल्या. याप्रसंगी जेष्ठ माता जिजाबाई कुरुमकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यापूर्वीची गाथा पती स्वातंत्र्य सेनानी माधवराव कुरुमकर यांनी सैन्य दलात काम करतानाच्या आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या की, ब्रिटिशांच्या काळात सैन्य दलात काम करताना त्याकाळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, वाहन व्यवस्था व यंत्रसामग्री नव्हती. शत्रूशी लढताना अक्षरशः पायपीट करावी लागत होती. जेवणही वेळेत मिळत नसे. परंतु देश सेवेचा अभिमान व कर्तव्य म्हणून देशाचे रक्षण करताना अक्षरशा डोळ्यात तेल घालू शत्रूशी लढावं लागत होत. पुढे दुसऱ्या महायुद्धात मोठे योगदान देऊन गाजवलेले शौर्य याविषयी त्या गहिवरून आल्या. त्या काळी ब्रिटिश सरकारने सैन्य दलात काम करणाऱ्या जवानांना दिलेली वागणूक या सर्व बाबी अंगावर शहारे आणण्यासारखे होत्या. अशा परिस्थितीत मी माझ्या सासरी सासू, सासरे, दीर, मुला बाळांचे संगोपन, करत संसार चालवला. पती प्रतिकूल परिस्थितीत देश सेवेत सैन्य दलात काम करंत असताना मी खंबीरपणे कुटुंब प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी समर्थपणे चालवली. अशा थरारक आठवणी एका ज्येष्ठ माता वीर जवान पत्नी जिजाबाई कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्या. या ध्वजारोहण सोहळ्यास वीर जवान माधवराव कुरुमकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र हरिभाऊ कुरुमकर, सोपानराव कुरुमकर, गावच्या सरपंच शुभांगीताई जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर, सेवा संस्थेचे चेअरमन रवींद्र खळतकर, व्हाईस चेअरमन मधुकर होले, संस्थेचे सर्व आजी-माजी संचालक भाजपा नेते नंदकुमार कोकाटे यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व आजी-माजी सदस्य विद्यार्थी ग्रामस्थ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन एम मोळक त्यांचे सर्व शिक्षक तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक शिवाजीराव नागवडे यांनी केले. तर आभार एस पी जगताप यांनी मानले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
22.7 ° C
22.7 °
22.7 °
89 %
5.2kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!