पिसोरेखांड सेवा संस्थेच्या पदाधिकऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात शरद श्रीराम यांचे उपोषण सुरू..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२६ डिसेंबर २०२३ :
विविध कार्यकारी सेवा संस्था पिसोरेखांड चेअरमन व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात युवा नेते शरद श्रीराम यांचे आज मंगळवार (दि. २६ डिसेंबर) पासून सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सदरील संस्था पिसोरेखांड गावाची कामधेनु असून सदरील संस्थेतून तेथील सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो त्यातून सभासद विविध हंगामात पिके घेऊन उदर निर्वाह करतात . परंतु संचालक मंडळ व चेअरमन यांच्या मनमानी कारभारामुळे संस्था दोन ते तीन महिन्यापासून बंद आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वादात सभासदांचे अतोनात नुकसान होत आहे. संस्थेचा कारभार पुन्हा सुरळीत चालवा व पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करू नये यासाठी आज दि. २६ डिसेंबर पासून सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
27.2 ° C
27.2 °
27.2 °
70 %
2.9kmh
100 %
Sun
28 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
33 °
Thu
34 °
error: Content is protected !!