लोकक्रांती
श्रीगोंदा दि.२० जानेवारी २०२४ :
गुरुवारी दिनांक- १८/०१/२०२४ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास सुरेगाव ता श्रीगोंदा येथे खून झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे बेलवंडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे पोलीस स्टेशनाच्या स्टाफासह रवाना होवुन सुरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या पाठीमागे राहणारा घडयाळ्या हिरामण चव्हाण याचे घरी जावुन चौकशी केली असता आरोपी नामे जावेद घडयाळया चव्हाण याने पत्नी वर्षा हिला घरी नांदण्यासाठी वडील घडयाळया हिरामन चव्हाण यांचेकडे पैसे मागितले ते पैसे न दिल्याचे कारणावरुन आरोपी जावेद चव्हाण याने हातातील चाकुने त्याचे वडील घडयाळया हिरामण चव्हाण याचे छातीवर मारुन जागीच ठार केली तसेच भाउ महावीर घडयाळया चव्हाण हा वडीलांना वाचविण्यासाठी आला असता त्याच्या मानेवर व कानाजवळ वार करुन गंभीर दुखापत करुन ठार केले आहे. सदरचा गुन्हा करुन आरोपी नामें जावेद घडयाळ्या चव्हाण हा कोठेतरी पळुन गेला होता.
माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब व
उपविभागीय कर्जत विभाग पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांनी घटनास्थळी भेट देवून पाहिजे आरोपी जावेद चव्हाण यास पकडण्याबाबत सुचना दिल्याने आरोपीच्या शोधार्थ बेलवंडी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व स्थागुशा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर आरोपी जावेद चव्हाण याचा शोध घेण्याच्या सुचना देवुन पथक रवाना केले. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गोपनिय बातमी मिळाली की, जावेद चव्हाण हा विसापुर येथे येणार आहे. तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोसई राजेंद्र चाटे, पो हे का हसन शेख पोहेकों भाउसाहेब यमगर, मपोना सुरेखा वलवे, पोकॉ. कैलास शिपनकर नेमून यांनी व स्थागुशा अहमदनगर चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मानवी कौशल्य वापर करुन अवघ्या ८ तासात आरोपीस हत्यारासह विसापुर गावातील चौकात शिताफीने ताब्यात घेतली. नमूद आरोपीस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केला असता खुन केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्हयाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब व उपविभागीय कर्जत विभाग पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात बेलवंडी पोस्टेचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व पोलीस निरीक्षक स्थागुक्षा दिनेश आहेर यांच्या समन्वयातून पोसई राजेंद्र चाटे, पो हे का हसन शेख पोहेकॉ भाऊसाहेब यमगर, पोहकों नंदकुमार पठारे, पौना शरद गांगर्ड, मपौना सुरेखा वलवे, म.पो.ना कविता माने, पोकों, कैलास शीपणकर, चापोहकों भाउसाहेब शिंदे नेमणूक बेलवंडी पोस्टे, स्थागुक्षा अहमदनगर येथील पोसई सोपान गोरे, पोहेकों फोलाणे, पोहेकों विशाल दळवी, पोहेकों संभाजी कोतकर, पोना भिमराज खर्स, पोकों रविंद्र घुंगासे, पोकों अमोल कोतकर, पोकों भाउसाहेब काळे नेम स्थागुशा अहमदनगर यांनी केली आहे.