लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२० जून २०२४ :
श्रीगोंदा शहरातील सावतानगर येथील माऊली मंदीराचे रस्त्याचे कडेला संपुर्ण परिसरात जवळपास २५ ते २६ पोल उभरण्यात आलेले आहे परंतु एक वर्षे होवुन, देखील आद्याप सदर पोलवर विद्युत पुरवठा सुरु केलेला नाही त्यामुळे या ठिकाणी रहाणारे रहिवाशी नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे. सदर ठिकाणी लवकरात लवकर विजकनेक्शन सुरु करणेत यावेत आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी अन्यथा ०१ जुलै रोजी श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असुन होणा-या परिणामास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
ज्या ठिकाणी हे पोल उभे आहेत त्या वरती विज कनेक्शन चालु नसल्यामुळे आंधारामध्ये मोठा अपघात होण्याचाही धोका आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर साप, विंचू या सारखे प्राणी वावरत असतात त्यांच्यापासून जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो तरी सदर बाबींचा गांभिर्येपुर्वक विचार करुन लवकरात लवकर विज कनेक्शन चालु करणेत यावे. अन्यथा ०१ जुलै रोजी श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असुन होणा-या परिणाम सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असे किरण बनसुडे, माधव शिवराम बनसुडे, मयुर पोपटदादा बनसुडे व इतर ग्रामस्थ सावतानगर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.