लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२८ जून २०२४ :
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे दि.२८ जून रोजी नगर – दौंड मार्गावरून खडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची दुचाकी वरून जाणाऱ्या मुलाला आणि महिलेला धडक बसली त्यामध्ये ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की चिंभळा येथील ४२ वर्षीय महिला व तिचा मुलगा घारगाव येथे दुपारी तीन सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान दुचाकी वरून जात असताना ही घटना घडली सदर महिला चिंभळा येथील रहिवासी असून सध्या ती दौंड येथे राहत असल्याचे समजते. घारगाव स्टॅन्ड जवळ ही महिला व तिचा मुलगा दुचाकीवरून चालले असताना खडी वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच १२ केपी ८११३ या वाहणाची धडक दुचाकी वर मागे बसलेल्या महिलेस बसल्याने ती खाली कोसळली व तिच्या एका बाजूवरून मागील चाक गेल्याची माहिती मिळाली असून या अपघातात ही महिला जागीच गतप्राण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान बेलवंडी पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन गर्दी कमी करून वाहतूक पूर्ववत केली.