टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.४ सप्टेंबर २०२२ : विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.बी.जे.शेखर पाटील साहेब, पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी मधील सराईत गुन्हेगार शोधण्याकामी विशेष मोहीम राबविणे बाबत स्थानिक पोलिसांना आदेश दिलेले आहेत.
या प्रकरणी वृत्त असे की, रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या भा.द.वि.क. ३९४, ३४ चा गुन्हा हा सराईत गुन्हेगार दिपक सुरेश गायकवाड व त्याचे दोन साथीदार यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोऱ्हाडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांना सुचना देवुन, शेडगाव फाटा ता. श्रीगोंदा येथे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी संशयित ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यासाठी सांगितले. या कॉबिंग ऑपरेशन दरम्यान एक संशयित ईसम मिळुन आला. त्यास ताब्यात घेवून, त्याचेकडे कसोशिने चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव दिपक सुरेश गायकवाड वय २६ वर्षे रा.भिंगान ता.श्रीगोंदा असे सांगितले.
दिपक गायकवाड याचेकडे चौकशी केली असता, त्याने हिरडगाव शिवारात दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांना मारहाण करुन, जबरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, तो २-३ वर्षापासुन वेशांतर करून पोलीसांना चकवा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच तो दरोडा, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, मोटार सायकल चोरी, डी.पी. चोरी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता.
नमूद आरोपीकडुन ४ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्ह्यात चोरीस गेलेली ९ हजार रुपये रोख रक्कम, ३०, हजार/ -रु. किं.ची. एक लाल रंगाची विना नंबरची एच.एफ. डीलक्स मोटार सायकल, ३० हजार/- रू . किं.ची. एक निळा पट्टा असलेली हीरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल, ४०, हजार/- रु.कि.ची. एक बिना नंबरची शाईन मोटार सायकल, ३०, हजार/ – रु .किं.ची.एक हीरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल असा एकूण १,३९,००० / – रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी दाखल सर्व गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.क. ३९५, ३९७, ३९९, ४५४, ३८०, ३७९, ३४, ४२७, ३१९, ४२७ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.क. ३९४,३४ मध्ये अटक केलेली आहे. आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्याचेकडे कसोशिने चौकशी करणार असुन, सदर आपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अण्णासाहेब जाधव साहेब, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी हे करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक मा. सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समीर अभंग, पोसई सुनिल सुर्यवंशी, पोसई प्रदिप बोऱ्हाडे, सफो अंकुश ठवळे ( एस डी पी ओ कार्या ), पोना गोकुळ इंगवले, पोकों प्रकाश मांडगे, पोकों किरण बोराडे, पोकों दादासाहेब टाके, पोकों अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)