लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ जुलै २०२४ :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा तालुका कार्यकारणी संदर्भात बैठक शनिवार दि.२० रोजी शासकीय विश्रामगृह श्रीगोंदा येथे पार पडली. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी माधव बनसुडे तर सचिवपदी अमोल झेंडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर भीमराव उल्हारे हे होते.
या कार्यक्रमासाठी पीएसआय मनोज खिळदकर, श्रीगोंदा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अशोक वाळुंज, राज्य माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचे महासचिव पाराजी मोरे, जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा खामकर,प्रहारचे युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक उत्तमराव राऊत, लहुजी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पत्रकार योगेश चंदन, आप्पा चव्हाण हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार किशोर मचे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश ओहोळ यांनी केले.
नूतन कार्यकारणी – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष माधव बनसुडे, सचिव डाॅ.अमोल झेंडे, उपाध्यक्ष नंदकुमार कुरुमकर,उपाध्यक्ष विजय उंडे,उपाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर येवले, तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्य संदिप (दादा) सोनवणे,राजेंद्र राऊत, शहराध्यक्ष नितीन रोही, कार्याध्यक्ष शफीक हवालदार, खजिनदार दत्ता जगताप, इलेक्ट्राॅनिक मिडीयाप्रमुख अनिल तुपे, सहसचिव सोहेल शेख, संघटक अमर घोडके,सल्लागार श्रीरंग साळवे, सदस्य धनेश गुगळे, सतिष ओहोळ, वैभव हराळ आदींसह पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.
चौकट
कलावंतांना साहित्यकांना शासनाकडून मानधन दिले जाते त्याचप्रमाणे पत्रकार सुद्धा समाजातील विविध प्रश्नांची जाण असलेला एक साहित्यिकच असतो समाजामध्ये काय घडते याची यथार्थ माहिती देण्याचे काम पत्रकार करत असतो.पत्रकारितेमध्ये वीस पंचवीस वर्षे काम केल्यानंतर शासनाकडून मानधन मिळावे अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे