लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ६ ऑगस्ट २०२४ :
तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिना सुरू होताच लिंपणगावमध्ये एक प्रकारचे भक्तीमय वातावरण तयार होत असते. त्यामध्ये मंगळवारी ६ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत गावात भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कालावधीत गावच्या सप्ताह मंडळाने राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने आयोजित केले आहेत. एक आठवडाभर अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त गावात पंढरीचे स्वरूप निर्माण होत असते. दरम्यान लिंपणगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज हे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. गावचे ग्रामदैवत हे काष्टी श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गावर पुरातन कालीन हेमाडपंती मंदिर आहे. श्रावण महिन्यातच नव्हे तर इतर दिवशीही अनेक भक्तगण दूरवरून नवस्फूर्तीसाठी सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतात. अनेकांना नवस्फूर्तीचा अनुभव देखील मिळाल्याचे भक्तगण सांगतात.

प्रामुख्याने पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविक भक्तांनी श्री सिद्धेश्वर महाराजांना महाभिषेक घालून कौटुंबिक सुख समाधान; सर्वांना निरोगी उदंड आयुष्य प्राप्त होऊ द्या; भरपूर धनधान्य मिळू द्या; सर्वांना सुखात आनंदात ठेवा; यासह सर्वांच्या कौटुंबिक अडचणी दूर होऊ द्या; अशा प्रार्थना करत सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालतात. निश्चितच सिद्धेश्वर महाराज हे भक्तांच्या नवसाला पावणारे ग्रामदैवत असल्याने या देवतावर भाविक भक्तांची अपार श्रद्धा निर्माण झाली आहे. गावचे ग्रामस्थ देखील आनंदी व उत्साही वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सिद्धेश्वर मंदिर सभोवताली विविध प्रकारचे आकर्षक अशी गंध फुलांची वृक्ष लागवड करून मंदिरासभोवताली प्रसन्न वातावरण सद्यस्थितीला दिसून येत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी किर्तन सोहळा आयोजित केला असल्याने या कीर्तन सोहळ्यासाठी ग्रामस्थ सप्ताह मडळाने भाविक भक्तांची सुसह्य अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चितच पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार निमित्त लिंपणगाव मध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. यानिमित्त महाभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ञ सुधीर कुलकर्णी व गुरव दांपत्य परिश्रम घेत आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!