दिगंबर भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण ता.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर संस्थेमार्फत पुरस्कार

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ६ ऑगस्ट २०२४ :
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर संस्थेमार्फत दिनांक ४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव जुने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपाध्यापक दिगंबर गोरख भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र असे होते.

तसेच बळीराम पांडुरंग जाधव मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा ता.जामखेड जि. अहमदनगर, बाळासाहेब गंगाधर गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव ता. दौंड जि. पुणे या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक सूर्यकांत रामदास पाटील मोटे हे होते. यामध्ये अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २४ जणांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक वैजापूर श्याम सुंदर कौठाळे, अभिनेता संकेत निकम, अभिनेत्री उर्मिला डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष अँड. धनराज अंभोरे व सचिव संतोष नामदेव दौंड उपस्थित होते .

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
75 %
5.9kmh
100 %
Fri
25 °
Sat
30 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
28 °
error: Content is protected !!