लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १२ ऑगस्ट २०२४ :
श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७५६/२०२४ बी.एन.एस. १०३(१) मधील आरोपी बापु झुंबर दातीर याला अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात आले. अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी ही कारवाई केली.
सविस्तर माहिती अशी की पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांचे सुचनेनुसार पोहेकॉ.मुकेशकुमार बडे, पोना.गोकुळ इंगवले, पोकॉ.आनंद मैड, पोकॉ.संभाजी गर्जे, पोकॉ.शरद चोभे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासामध्ये सुपा पोलीस स्टेशन हद्दीतुन डोंगराळ भागातून पाठलाग करुन एका झाडाखाली बसलेले असताना ताब्यात घेतलेला आहे. पुढिल कायदेशीर कारवाई पोलीस करत आहोत.