नागवडे सहकारी साखर कारखान्याची ५९वी अधिमंडळ आर्थिक वार्षिकसभा मंगळवार दि.२७ रोजी आयोजित – व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२४ :
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची ५९ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर अधिमंडळ वार्षिक सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस यांनी दिली. भोस यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या मंगळवार दिनांक २७ रोजी होणाऱ्या ५९ व्या वार्षिक आधिमंडळ सभेची नोटीस व अहवाल सभासदांना पाठविण्यात आलेला आहे.

सदर विषय पत्रिकेनुसार त्या विषयवार कामकाज व चर्चा सभेमध्ये होणार आहे‌. तरी सदर सभेस सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
25.4 ° C
25.4 °
25.4 °
79 %
7.3kmh
76 %
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
32 °
error: Content is protected !!