लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २८ ऑगस्ट २०२४ :
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी व संभाजी ब्रिगेडने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. या आंदोलनाचे आवाहन एक दिवसापूर्वी केले होते आंदोलनामध्ये मोजकेच शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेड संघटना कार्यकर्ते सहभागी झाल्याने उपस्थितांनी झोपलेल्या जनतेचा तसेच सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तालुक्यातील एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही मोठमोठ्या कार्यक्रमांमधून नेते मंडळी गर्दी गोळा करतात डीजेच्या तालावर हीरोइन नाचवल्या जातात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून राजकारण केले जाते परंतु महाराजांचा सिंधुदुर्ग शेजारी राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो आणि श्रीगोंद्यातील नेते साधा निषेधही व्यक्त करण्यासाठी येत नाहीत ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे अशा तीव्र शब्दात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी आंदोलनावेळी टीका केली आणि सरकारचा जाहीर निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे. शिवरायांच्या नावावर या
महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे. आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले होते हे विशेष.
भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या
जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब
कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने यावेळी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनात सहभागी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, तालुका अध्यक्ष शाम जरे,तालुका अध्यक्ष प्रसाद काटे, दिलीप लबडे, राजेंद्र राऊत, गोरख घोडके, लालूदादा मखरे, परीश जाधव, मयूर बनसोडे, मुकुंद सोनटक्के, अविनाश घोडके, प्रवीण शेलार, अक्षय लोखंडे, चि. चैतन्य ज्ञानेश्वर आजबे, संदिप साळवे, नंदू दुर्गे, बाळू बोरुडे, अजीम जकते, संतोष गायकवाड, सुमित साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.