वार्तांकन करताना पत्रकाराचा भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून अपमान; श्रीगोंदा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून निषेध..!

मालवण येथे abp माझाच्या महिला पत्रकाराचा अपमान केल्या प्रकरणी श्रीगोंद्यात तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३० ऑगस्ट २०२४ :
मालवण येथील राजकोट किल्यावर abp माझाच्या महिला पत्रकार वार्ताकंन करण्यासाठी गेल्या असता त्यांचा बूम हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते अपमान होईल असे बोलले होते. त्यामुळे श्रीगोंदा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा श्रीगोंदा यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. तसे निवेदन तहसीलदार श्रीगोंदा व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष माधव बनसुडे, मीडिया प्रमुख अनिल तुपे सचिव अमोल झेंडे, उपाध्यक्ष माऊली येवले, प्रवक्ते किशोर मचे, शहराध्यक्ष नितीन रोही, कार्याध्यक्ष शफिक हावालदार,राजेंद्र राऊत, संघटक अमर घोडके, वैभव हराळ आदी उपस्थित होते

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
scattered clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
74 %
6.5kmh
33 %
Sun
26 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
error: Content is protected !!