श्रीगोंद्यात शिवशंभु सायकल असोसिएशनने केले मॅरेथॉनचे आयोजन

मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील धावपटूंनी वर्चस्व गाजविले

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १ सप्टेंबर २०२४ :
शिवशंभु सायकल असोसिएशनने आयोजीत जोधपुर मारुती चौक ते डॉ ए पी जे अब्दुल कलाम चौक पर्यत पाच किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. मॅरेथॉनचे उदघाटन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी उद्योजक विठ्ठलराव जगदाळे श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांचे हस्ते झाले

मॅरेथॉन स्पर्धेत श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील धावपटूंनी वर्चस्व गाजविले. मुलींमध्ये ऋतुजा जगताप ही अनवाणी धावली आणि विजेतेपद पटकाविले. ६० वर्षीय कमल खेतमाळीस यांनी पाच किमीचे अंतर पार करून लक्ष वेधले.या मॅरेथॉनमध्ये मुलामध्ये भूषण विजय गिरमकर  (प्रथम)  शुभम अनिल असवले (द्वितीय)  रवी सतीश मोकाटे (तृतीय) तर  मुलींमध्ये ऋतुजा शिवाजी  जगताप (प्रथम)  रोहिणी तात्याराम शिंदे (द्वितीय) रूपाली युवराज देवखिळे (तृतीय) तसेच बाल धावपटू हर्षवर्धन सागर पवार, शांभवी गणेश कुदळे, विश्वेश ढवळे यांनी लक्ष वेधले

प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी म्हणाले की मोबाईल च्या जमान्यात मुलांचे मैदान आणि मातीला पाय लागत नाहीत त्यामुळे तरुण मनी वृध्दावस्था येऊ पाहत आहे त्यामुळे योगा धावणे सायकल चालविणे सारखे व्यायाम करणे गरजचे आहे. यावेळी  घनश्याम शेलार, प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी, उपनिरीक्षक गणेश कुदळे, श्रीगोंदा तालुका माजी सैनीक संघटनचे संदीप सांगळे, संजय आनंदकर, नवनाथ खामकर, भाऊसाहेब वाघ यांची भाषणे झाली

मॅरेथॉन यशस्वी होणाऱ्या सतिश चोरमले, प्रा वैभव सोनवणे, प्रा महेश गिरमकर, गौरी कोहळे, अॅड संदीप येडे, गोपाळराव डांगे, ज्ञानेश्वर बोरूडे, दादासाहेब कोल्हे नी विशेष परिश्रम घेतले आभार शिवशंभुच्या अध्यक्ष विजया लंके यांनी केले. सोबत फोटो जोडला आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
74 %
10.3kmh
100 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
24 °
Wed
25 °
Thu
29 °
error: Content is protected !!