टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१३ सप्टेंबर २०२२ : गेल्या चार महिन्यापूर्वी ०९ जून २०२२ ला पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडून खांडगाव वडघुल ग्रामपंचायत साठी नवीन ग्रामसेवक ची नेमणूक केली.नव्याने नेमणूक केलेल्या ग्रामसेवकाला पदभार स्वीकारत असताना तत्कालीन ग्रामसेवक बाळू धायगुडे यांनी ग्रामसभा प्रोसिडिंग बुक, मासिक सभा प्रोसिडिंग बुक, सन २०१५-१६ ते सन २०१९-२० दलित वस्ती कॅश बुक, कुठलेही कागदपत्रे जमा केली नसल्यामुळे नव्याने कार्यरत असलेले ग्रामसेवक अतिश आखाडे यांचे कामकाज नियमित चांगले असून तत्कालीन ग्रामसेवक बाळू धायगुडे यांनी कार्यभार अपूर्ण दिल्यामुळे वरिष्ठ कार्यालयास माहिती सादर करण्यास अडचण निर्माण होत आहे. शासन निर्णय दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ नुसार सन २०२१-२२ व सन २०२२-२३ साठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करण्या संदर्भात सुधारित बृहत आराखडा तयार करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषद स्तरावर विकास आराखडे मागवली होती. तालुक्यातील सर्व गावांचे विकास आराखडा पंचायत समितीकडे बहुतशा सादर झालेले आहेत. तात्कालीन ग्रामसेवक बाळू धायगुडे यांच्या अपूर्ण कार्यभार, तसेच सन २०१५-१६ ते सन २०१९-२०दलित वस्ती कॅश बुक नसल्यामुळे विकास आराखडा तयार करण्यास विलंब होत आहे ही बाब उपसरपंच राम घोडके यांनी गटविकास अधिकारी डॉ.राम जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज बनकर साहेब, विस्तार अधिकारी पोपटराव यादव यांच्या लक्षात आणून दिली. पंचायत समिती श्रीगोंदा येथील वरील अधिकाऱ्यांनी बाळू धायगुडे यांना भ्रमण ध्वनी द्वारे कळून सुद्धा यांनी अपूर्ण कार्यभार आज पर्यंत ग्रामपंचायत खांडगाव – वडघुल यांच्या कडे दिला नाही.
गेल्या चार महिन्यापासून ग्रामसेवक धायगुडे यांना ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांनी अपूर्ण दप्तर पूर्ण करुन देण्याची मागणी केली असता त्यांनी वरील सर्व मंडळींना उडवा उडवीचे उत्तर देताना आढळून आले. बऱ्याच वेळा फोन सुद्धा रिसीव केला नाही. धायगुडे हे कधी कुणाला घाबरत नाहीत अशी दबक्या आवाजात पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात चर्चा सुरू आहे.
तत्कालीन ग्रामसेवक धायगुडे यांच्या आडमुठी धोरणामुळे खांडगाव वडघुल येथील विकास कामाला खिळ बसली असून त्याची सर्वस्व जबाबदार तेच आहेत. ही बाब उपसरपंच राम घोडके यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्या कानावर घातली तरी ही तात्कालीन ग्रामसेवक धायगुडे यांनी अपूर्ण कार्यभार न सोपविल्यामुळे दिनांक १२ सप्टेंबर रोजी गटविकास यांना अर्जा द्वारे आम्हाला तात्काळ अपूर्ण दप्तर मिळावे अशी मागणी उपसरपंच राम घोडके यांनी केली.
जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेबांना, तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे साहेबांना भ्रमण ध्वनी द्वारे, उपसरपंच राम घोडके यांनी हा सर्व प्रकार सांगून सुध्दा काल सोमवार १२ सप्टेंबर संध्याकाळपर्यंत तात्कालीन ग्रामसेवक बाळू धायगुडे हे ग्रामसभा प्रोसिडिंग बुक, मासिक प्रोसिडिंग बुक, दलीत वस्ती कॅशबुक हे नव्याने कार्यरत असलेल्या ग्रामसेवक यांच्या कडे जमा करतील अशी अपेक्षा खांडगाव – वडघुल येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना होती परंतु ती ही मावळली याचा खेद उपसरपंच राम घोडके यांनी व्यक्त केला.
तत्कालीन ग्रामसेवक धायगुडे यांनी ग्रामपंचायत खांडगाव वडघूल चे दप्तर चार महिने होऊन गेले तरी का दिले नाही याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून चौकशी व्हावी अशी मागणी उपसरपंच राम घोडके हे लवकरच करणार आहेत.
स्त्रोत:(प्रेस नोट)