अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी – संभाजी ब्रिगेड

नुकसानीची आर्थिक भरपाई लवकर जाहीर करावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून तहसीलदार यांना देण्यात आले

श्रीगोंदा, ता. २५ : मागील दोन तीन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात सतत अतिवृस्टी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर मोठ्या पावसामुळे शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेती नापीक बनली आहे,तसेच अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे,अनेक भागांत छोटे छोटे रस्ते व पुल देखील वाहून गेल्यामुळे संपर्क देखील तुटला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आयिवृष्टीमुळे झालेल्या या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनाचे करुन नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर पाठवून शेतकऱ्यांना नुकसानीची आर्थिक भरपाई जाहीर करावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहराध्यक्ष विनोद मेहत्रे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चौकट
प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असून निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड या विषयात तीव्र आंदोल करेल.
– इंजि. शामभाऊ जरे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!